सध्या 10वी, 12वी च्या बोर्ड परीक्षा सुरू आहेत. अशामध्ये पेपरफूटीचे, कॉपीच्या घटना समोर येत आहेत. काल बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची एक बाब समोर आली आहे.  गणिताच्या पेपरचा काही भाग सोशल मीडीयामध्ये व्हॉट्सवर आढळला आहे. याप्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये 3 जण  दादरच्या Dr.Antonio D'Silva High School&Jr College चे आहेत. सध्या या प्रकरणी क्राईम ब्रांच अधिक तपास करत आहे. नक्की वाचा: Cops Beat Father in Jalgaon: जळगावात लेकाला बोर्ड परीक्षेत कॉपी पुरवायला गेलेल्या बापाला पोलिसांनी चोपलं (Watch Viral Video) 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)