सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ कोल्हापूर येथील असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओत पाहायला मिळते आहे की, एक युगूल नदीपात्रात उतरुन स्वच्छता करते आहे. हे नदीपात्र पंचगंगा नदीचे असल्याचे समजते. तसेच, नदीतील जलपर्णी हटवणारे हे युगूल वर आणि वधू असल्याचे त्यांच्या कपड्यांवरुन प्रथमदर्शनी तरी वाटते आहे. ते स्वच्छतेचा संदेश देत आहेत खरे. मात्र, ते खरोखरच वर-वधू आहेत की इन्स्टाग्राम रिल्स अथवा एखाद्या चित्रपटासाठी चित्रिकरण करत आहेत याबाबत माहिती मिळू शकली नही. व्हिडि मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा, Viral Video: इंजिनियर नवरा दुसऱ्या स्त्रीसोबत करत होता मस्ती; पत्नी आणि मेव्हण्याने रंगेहात पकडून केली बेदम मारहाण, पाहा व्हिडिओ)

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)