आज सकाळी मुंबई-पुणे जुना महामार्गवरून पुण्यातून मुंबईला येणार्‍या बसला भीषण अपघात झाला आहे. दरीत कोसळलेल्या बसमध्ये 12-15 जणांचा मृत्यू झाला आहे. काही जण जखमी आहेत. या दु:खद घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींवर सरकारी खर्चाने उपचार केले जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी घटनेची माहिती रायगड जिल्हाधिकारी आणि एसपींनी घेतली असल्याची माहिती देखील दिली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)