जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून (Old Mumbai-Pune Highway) जात असलेली खाजगी बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. लोणावळा जवळ असलेल्या बोरघाट येथील शिंगरोबा मंदिराजवळ (Shingroba Temple) आज पहाटे 4 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. पुण्यातून मुंबईकडे ही जात होती. दरम्यान चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. बस अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर 25 पेक्षा जास्त प्रवासी जखमी अवस्थेमध्ये आहेत. त्यांना नजिकच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये लहान मुलांचादेखील समावेश आहे.
रिपोर्ट्सनुसार, बस मध्ये 40-45 जण असल्याचा अंदाज आहे. हे सारे प्रवासी मुंबईच्या गोरेगाव भागातील बाजीप्रभू वादक गट (झांज पथक) चे होते. हे पथक पुण्यामध्ये एका कार्यक्रमाला गेले होते. पुण्यावरून परत येत असताना त्यांच्या बसला अपघात झाला. रायगडच्या खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील हा अपघात आहे. बसचालकाचा ताबा सुटल्याने बस थेट दरीत कोसळली. Baramati Bus Accident: बारामतीत बस रस्त्यावरून उलटली; एकाचा मृत्यू, 22 जण जखमी .
नक्की वाचा:
Maharashtra| 7 people died & more than 25 injured after a bus fell into a ditch in Raigad's Khopoli area. Rescue operations underway: Raigad SP pic.twitter.com/kneqn5M4A5
— ANI (@ANI) April 15, 2023
VIDEO | Several dead as bus fell into a gorge in Raigad district of Maharashtra in the early hours of Saturday. pic.twitter.com/O38G7edD9i
— Press Trust of India (@PTI_News) April 15, 2023
अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांच्या मदतकार्यासाठी हायकर्स ग्रुप व आयआरबीचं पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. खाजगी रुग्णालयातील डॅाक्टर्सना मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे.