Accident (PC - File Image)

Baramati Bus Accident: पुणे (Pune) जिल्ह्यात शनिवारी पहाटे बस रस्त्यावरून पलटी होऊन खड्ड्यात पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले. बारामती (Baramati) तालुक्यातील मालाड गावाजवळ शनिवारी पहाटे 5.30 वाजता हा अपघात (Accident) झाला. यासंदर्भात दौंड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, 50 प्रवासी घेऊन खासगी बस तुळजापूरहून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्यावरून घसरून खड्ड्यात पडली. या अपघातात एक प्रवासी ठार झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. (हेही वाचा - Purandar Bus-Bike Accident: एकूलते एक असलेले तीन तरुण ठार; एसटी बस आणि दुचाकी अपघातात 3 कुटुंबावर शोककळा; पुरंदर येथील घटना)

अपघातात जखमी झालेल्या सोळा जखमींना पिरॅमिड ट्रॉमा सेंटरमध्ये तर उर्वरित सहा जणांना भिगवणच्या आयसीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बस कोल्हापूर, पंढरपूर आदी यात्रेसाठी भाडेतत्वावर ठेवली होती. या अपघातातील बहुतांश प्रवासी येथील भवानी पेठेतील रहिवासी आहेत.

शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे तीन दुचारीस्वार तरुणांचा आणि एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात तीनही तरुणाचा मृत्यू झाला. वेगवेळ्या कुटुंबातील एकुलते एक अपत्य असलेल्या तिघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. हे तीन तरुण पुरंदर तालुक्यात असणाऱ्या थोपटेवाडी गावचे रहिवाशी होते.