कोविड-19 महामारीच्या काळात स्थलांतरितांना खिचडी तयार करण्यात कथित अनियमिततेची प्राथमिक तपासणी EOW करत आहे. या कामाचे कंत्राट बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिले होते. या प्रकरणी शिवसेना (UBT) कार्यकर्ता सूरज चव्हाण याचीही चौकशी सुरु होती. आता माहिती मिळत आहे की, आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या सूरज चव्हाणला ईडीने अटक केली आहे. बीएमसी खिचडी कोविड घोटाळा प्रकरणी ईडीने सूरज चव्हाणला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ईडीने या प्रकरणाशी संबंधित आरोपींच्या ठिकाणांवर छापे टाकले होते.
यापूर्वी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बीएमसी कोविड सेंटर खिचडी घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण सुमारे 6.7 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आहे. सूरज चव्हाण हे शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांच्या जवळचे असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. नंतर, या एफआयआरच्या आधारे, ईडीने पीएमएलए अंतर्गत कारवाई सुरू केली. (हेही वाचा: Uddhav Thackeray Maha Patrakarparishad: 2013 च्या शिवसेनेच्या घटनादुरूस्ती च्या ठरावाचा व्हीडिओ महापत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंकडून सादर)
Mumbai | Suraj Chavan, close aide of Shiv Sena (UBT) MLA Aaditya Thackeray, arrested by ED in BMC Khichdi COVID scam case.
— ANI (@ANI) January 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)