Mumbai: आयपीएस अधिकारी देवेन भारती यांनी मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे. देवेन भारती हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू अधिकारी म्हणून ओळखले जातात. याआधी देवेन यांनी मुंबई पोलिस आयुक्त आणि पोलिस सहआयुक्त ही पदे भूषवली आहेत. मात्र विशेष पोलीस आयुक्तपद भारती यांच्यासाठी खास तयार करण्यात आल्याने राजकीय वर्तुळातही वाद सुरू झाला आहे. फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट दिल्यानंतर फडणवीस यांनी भारती यांची विशेष पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करून पुढचे पाऊल टाकले आहे.
Maharashtra | IPS officer Deven Bharti takes charge as Special Commissioner of Police of Mumbai. pic.twitter.com/1fCeXI0cIU
— ANI (@ANI) January 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)