मुंबईत सुरु असलेली इंडिया आघाडीची आजची बैठक पार पडली. विरोधी पक्षाच्या अनौपचारिक बैठकीनंतर मुंबईतील हॉटेलमधून बाहेर पडताना शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही (इंडिया आघाडी पक्ष) उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली आणि जागावाटपाची प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. आजच्या बैठकीमध्ये 28 पक्ष सामील झाले होते. याआधी 23 जून रोजी पाटणा येथे विरोधी आघाडीची पहिली बैठक झाली. त्यानंतर दुसरी बैठक 17-18 जुलै रोजी बेंगळुरू येथे झाली. आता ही तिसरी बैठक मुंबईमध्ये होत आहे.
उद्या सकाळी सकाळी 10.15 ग्रुप फोटो सेशन होणार आहे. त्यानंतर 10.30 ते दुपारी 2 पर्यंत बैठक होईल व त्यात लोगोचे अनावरण केले जाईल. दुपारी 2 वाजता MPCC आणि MRCC द्वारे दुपारचे जेवण आणि दुपारी 3.30 वाजता इंडिया आघाडीची पत्रकार परिषद असेल. (हेही वाचा: Rahul Gandhi On Adani Group: अदानी समूहातील पैसा कोणाचा? राहुल गांधी यांचा PM नरेंद्र मोदी यांना सवाल)
The #INDIA bloc, comprising several Opposition parties, will finalise the seat sharing among the alliance partners for the upcoming #LokSabhaelections by September 30. https://t.co/uDJ0nx9EdR
— The Siasat Daily (@TheSiasatDaily) August 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)