घाटकोपरच्या पंत नगर भागात एका दुःखद घटनेत, खोल नाल्यात पडलेल्या 8 वर्षांच्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करताना, 28 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. पंत नगर पोलिसांनी एडीआर गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी दुपारी पंत नगर येथील रहिवासी असलेली ही मुलगी तिच्या घराजवळ इतर मुलांसोबत खेळत असताना ही घटना घडली. खेळादरम्यान, जॉय मॅक्स स्कूलच्या मागे असलेल्या एका मोठ्या आणि खोल नाल्यात एक चेंडू पडला. चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना, मुलीचा तोल गेला आणि ती नाल्यात पडली. यानंतर मुलीने मदतीसाठी आरडओरडा सुरु केला.

त्यावेळी शहजाद खान हा तरुण तिच्या जवळून जात होता. मुलीचा आवाज ऐकून लगेचच तिला वाचवण्यासाठी त्याने नाल्यात उडी मारली. त्याने मुलीला वाचवण्यात आणि तिला सुरक्षित ठिकाणी आणण्यात यश मिळवले. परंतु, यावेळी तो बुडाला. या प्रकरणी पंत नगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. अग्निशमन दलाने वेळीच मदत केली असती, तर शहजादला वाचवता आले असते, असा स्थानिकांचा आरोप आहे. (हेही वाचा: Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)