गणेश उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमनी मुंबई, पुण्यातून कोकणात आपल्या गावी जात असतात. आरामदायी आणि किफायतशीर दरामध्ये प्रवासाचा मार्ग म्हणून अनेक जण रेल्वे प्रवास निवडतात. त्यामुळे गणपतीच्या दिवसात प्रवाशांना तिकीटं उपलब्ध व्हावीत याकरिता आता रेल्वेकडून गणपती विशेष गाड्यांच्या घोषणा आणि बुकिंग सुरू झाल्या आहेत. मध्य रेल्वे कडून यापूर्वी 156 गाड्या जाहीर झाल्या आहेत त्यामध्ये आज 52 नव्या गाड्यांची भर टाकण्यात आली आहे. दिवा- चिपळूण विशेष- ३६ फेऱ्या चालवणार आहे तर एलटिटी- मेंगळूरू विशेष- १६ फेऱ्या चालवणार आहे. 3 जुलै पासून बुकिंग सुरू होणार आहे.  Ganpati Special Trains: आगामी गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून 'गणपती विशेष गाड्यांची' घोषणा; जाणून घ्या ट्रेन्स, वेळा, थांबे आणि कधी सुरु होणार बुकिंग .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)