Indian Railways | Representational Image (Photo Credits: Pixabay)

गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) काळात अनेक लोक आपापल्या गावी जातात. या दरम्यान गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. अशात आता गणेशोत्सवाच्या काही महिने अगोदर मध्य रेल्वेने (Central Railway), उत्सवादरम्यान प्रवास सुकर करण्यासाठी गणपती विशेष गाड्या (Ganpati Special Trains) चालवण्याची घोषणा केली आहे. सप्टेंबर 2023 मध्ये साजरा होणाऱ्या गणपती उत्सवावेळी प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता, या गाड्या विविध मार्गांवर धावतील आणि प्रवाशांना प्रवासासाठी सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून देतील. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्क आकारून सर्व गणपती स्पेशलचे बुकिंग 27 सप्टेंबरपासून सुरू होईल.

मुंबई-सावंतवाडी रोड स्पेशल- 

ट्रेन क्रमांक 01171 ही गाडी 13 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोबर 2023 दरम्यान चालवली जाईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ही गाडी दररोज सकाळी 00:20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 2:20 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01172 सावंतवाडी रोडवरून दररोज पहाटे 3:10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 04:35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबेल.

एलटीटी- कुडाळ विशेष-

ट्रेन क्रमांक 01167 ही एलटीटीवरून 13, 14, 19, 20, 21, 24, 25, 26, 27, 28 सप्टेंबर आणि 1 व 2 ऑक्टोबर रोजी रात्री 10:15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता कुडाळ येथे पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01168 कुडाळ येथून 14, 15, 20, 21, 22, 25, 26, 27, 28, 29 सप्टेंबर आणि आणि 2 व 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9.55 ला एलटीटी येथे पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग येथे थांबेल.

पुणे-करमाळी/कुडाळ-पुणे विशेष-

गाडी क्रमांक 01169 पुण्याहून 15, 22 आणि 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10:00 वाजता कुडाळ येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक 01170 कुडाळ येथून 17, 24 सप्टेंबर आणि 01 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4:05 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 05:50 वाजता पुण्याला पोहोचेल.

ही गाडी लोणावळा, पनवेल, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग या स्थानकांवर थांबेल.

करमाळी-पनवेल-कुडाळ विशेष (साप्ताहिक)-

ट्रेन क्रमांक 01187 विशेष गाडी 16 आणि 30 सप्टेंबर रोजी दुपारी 2.50 वाजता करमाळीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 02.45 वाजता पनवेलला पोहोचेल.

01188 विशेष गाडी 17, 24 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी पहाटे 05.00 वाजता पनवेलहून सुटेल  आणि त्याच दिवशी दुपारी 2 वाजता कुडाळ येथे पोहोचेल.

ही गाडी थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, काकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, रोहा आणि माणगाव येथे थांबेल.

दिवा-रत्नागिरी स्पेशल- 

ट्रेन क्रमांक 01153 विशेष (12 डब्यांची ट्रेन) दिवा येथून 13 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 07.10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 2.55 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

परतीच्या दिशेने गाडी क्रमांक 01154 स्पेशल 13 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर रत्नागिरीहून दुपारी 3.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 20.40 वाजता दिवा येथे पोहोचेल.

गाडी रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल.

मुंबई- मडगाव विशेष (दैनिक)-

ट्रेन क्रमांक 01151 स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 13 सप्टेंबर 2023 ते 02 ऑक्टोबर 2023 दररोज सकाळी 11.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 02.10 वाजता मडगावला पोहोचेल.

परतीच्या दिशेने गाडी क्रमांक 01152 स्पेशल मडगावहून 13 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर दररोज पहाटे 3.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 17.05 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल. (हेही वाचा: Monsoon and Inflation: मान्सून लांबल्याने अन्नधान्यांच्या किमतीत वाढ, सामान्यांच्या खिशावरील भुर्दंड वाढण्याची शक्यता; सरकारकडून उपाययोजना सुरु)

ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी. येथे थांबेल.