मुंबई मध्ये बीएमसीतील शिवसेनेच्या कामाविरूद्ध भाजपाकडून पोल  खोल कॅम्पेन बस चालवत आहे. यावर अनेक ठिकाणि हल्ले, तोडफोड झाली आहे. दरम्यान चेंबूर भागात 'Pol Khol' Campaign Bus वर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 4 जणांची ओळख पटली असून शोध सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार उघड करण्यासाठी भाजपाच्यावतीनं पोलखोल रथ आंदोलनाला चेंबूर उपनगरातून  प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला आहे. 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)