आजकाल पारंपारिक सिगारेटसोबतच अनेक तरुणांमध्ये ई-सिगारेट अधिक प्रसिद्ध झाली आहे. आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील ई-सिगारेटचा वापर रोखण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयाच्या परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारने ई-सिगारेटचे उत्पादन, विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे. 2019 मध्ये यासाठी कायदा करण्यात आला आहे. मात्र, ऑनलाइन वेबसाइट आणि स्थानिक दुकानांवर ई-सिगारेट उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच महाविद्यालयाच्या परिसरात ई-सिगारेटची विक्री करून विद्यार्थी व्यसनाच्या जाळ्यात ओढले जात आहेत. ही बाब लक्षात घेऊन उच्च शिक्षण संचालनालयाने विद्यापीठे आणि महाविद्यालयांना ई-सिगारेटचा वापर रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. उच्च शिक्षण संचालनालयाच्या आदेशानंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी परिपत्रक काढून महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसरात ई-सिगारेटची विक्री व वापर होणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (हेही वाचा: Suicide Case: फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थांची आत्महत्या, परिसरात आणि कॉलेजमध्ये हळहळ)
Savitribai Phule Pune university instructs to conduct special inspection campaign to curb e-cigarettes in college premiseshttps://t.co/ofI4CoqKPS
— Pune News (@punenews9) July 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)