Suicide | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Suicide Case: पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये (Fergusson College) शिकणाऱ्या विद्यार्थांने आत्महत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. राहत्या वसतीगृहात त्यांने गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केल्याचे समोर आले आहे. काल रात्री त्याने टोकाचे पाऊल उचलेल त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिकांना समजताच त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी या घटनेची तपासणी केली परंतू त्याने आत्महत्या का केलं याचं कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. फर्ग्युसन कॉलेज मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थांने आत्महत्या केली त्यामुळे कॉलेजमध्ये ही हळहळ पसरली आहे,

पुण्यात उच्यभ्रू परिसरात राहणाऱ्या वसतिगृहात याने आत्महत्या केली.  फर्ग्युसन महाविद्यालयात बीएससी भौतिकशास्त्राच्या तिसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊस उचलत गळफास घेत आयुष्य संपवले आहे. या प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत हे काम चालू होतं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. नाशिक हे त्याचं मुळ गाव होत.तो पुण्यात शिकण्यासाठी आला होता.  ओम कापडणे असं मृत मुलाचे नाव आहे.  २० व्या वर्षी त्याने आयुष्य संपवले.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओम कापडणे हा वडारवाडी येथील विष्णू कुंज वसतिगृहात राहतो. राहत्या घरात त्यांने गुरुवारी गळफास घेतला.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला. त्याच्या आई वडिलांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी राहत्या घरी तपासणी केली परंतु पोलिसांना कुठलं ही पत्र  आढळून आलेलं नाही त्यामुळे त्याने आत्महत्या का केली याचं उत्तर अद्यापही समोर आलं नाही,  ओमला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. पुढील तपास चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण करत आहे.