Mumbai Weather Forecast Today: मुंबईत काल रात्री पासून सतत मुसळधार पाऊस सुरु आहे.मुसळधार पावसामुळे मुंबईत काही ठिराणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. या घटनेची परिस्थिती पाहून हवामान विभागाने आज अलर्ट जारी केला आहे. आज तापमान 27 सेल्सियस डिग्री आणि 28 सेल्सियस डिग्री दरम्यान असेपल, किमान 24 सेल्सियस डिग्री पर्यंत अशू शकते. ठाणे, मुंबई, नाशिक, पालघर, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ या भागात विजेचा गडगडात होण्याची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, रायगडमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा आहे. मुंबईत मध्यरात्री पासून ते पहाटे पर्यंत अतिमुसधार पाऊस पडत होत. हेही वाचा- खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला
उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)