सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील समुद्रात पुण्यातील एका खासगी अकादमीच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रचंड दु:ख झाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ही भावना आपल्या एक्स हँडलवर लिहिलेल्या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे. शिंदे यांनी म्हटले आहे की, ही घटना दुर्दैवी आहे. अशा घटना यापुढे घडू नयेत यासाठी जिल्हा प्रशासनाला धोकादायक समुद्र किनारा परिसरात अधिक सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. समुद्र किनारी धोकादायक परिस्थिती असेल तर स्थानिकांकडून दिली जाणारी माहिती व प्रशासनाकडून दिला जाणारा इशारा याकडे पर्यटनासाठी गेलेल्यांनी दुर्लक्ष करू नये असे आवाहनही केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्र्यांनी संवेदना प्रकट केली आहे. (हेही वाचा, Sindhudurg 4 Girls Drowned: देवगड समुद्र किनारी पर्यटनासाठी आलेले पाचं पर्यटक बुडाले, 4 मुलींचा मृत्यू, 1 मुलगा बेपत्ता)

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)