अकोला दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला महाराष्ट्र सरकार कडून प्रत्येकी 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींवर मोफत ट्रीटमेंट केली जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. काल रात्री जोरदार वारा आणि पावसामुळे एक झाड बाळापूर तालुक्यातील पारस येथे समर्थ बाबूजी महाराज संस्थान मंदिराच्या छतावर पडलं आणि काही भाविक दबले आहेत.
पहा ट्वीट
अकोल्यातील दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत जाहीर.@DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/7HpabJMrVj
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) April 10, 2023
पारस (जि.अकोला) येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली असून जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)