आदित्य ठाकरे यांनी मागील काही दिवसांत मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांच्या परदेशी दौर्यावर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या ट्वीट्स नंतर हे दौरे रद्द झाल्याचं देखील जाहीर करण्यात आलं. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौर्याबद्दलही काही खुलासे केले आहेत. दरम्यान यानंतर सोशल मीडीयात एक्स (पूर्वीचे ट्वीटर) यावर शिंदे गट आणि महाराष्ट्र भाजपा याकडून त्यांच्या इंग्लंड दौर्यांबाबत, दावोसच्या आणि उद्धव ठाकरेंच्या आजारपणात त्यांनी केलेल्या परदेश दौर्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. मात्र टीकेला आदित्य ठाकरेंनी आज एक ट्वीट करतच उत्तर दिलं आहे.
आदित्य ठाकरे यांचं उत्तर
कितीही प्रयत्न करा, माझ्या नावात तुम्हाला ‘बाळ’ हा शब्द लावावाच लागला. ते माझ्या रक्तातच आहे आणि म्हणूनच जनतेचे आशीर्वाद माझ्या सोबत आहेत ! अभिमान आहे !
एका ‘आदू बाळा’ साठी तुमचा एवढा राग आणि तुमची ही भाषाच तुमच्या मनात बसलेली भीती आणि तुमच्या घरातले संस्कार ह्या बद्दल फार काही…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 1, 2023
' @AUThackeray , जेवढ झेपतं तेवढंच बोलावं..
माननीय देवेंद्रजीं यांनी आपल्या जपान येथील दौऱ्यात, जपान सरकार बरोबर विविध करार करून महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केले हे बघ जरा. pic.twitter.com/JXbDJ2UGcj
आदूबाळ सरकारी खर्चाने दावोसला गेलात… तेव्हा तुम्ही ना राज्याचे मुख्यमंत्री होतात ना उद्योगमंत्री … मग कुठल्या अधिकारात तुम्ही तिथे गेलात ? ती सरकारी पैशांची उधळपट्टी नव्हती का ?
त्यावेळी तुमच्या वडीलांचे मोठे ऑपरेशन होणार होते. तसेच, ज्या आजोबांच्या नावावर आजही राजकारण करीत…
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) September 30, 2023
शाळेतील बडबडगीते म्हणण्याची जेव्हा बालबुद्धी आणि वय असते, त्या वयात सरकारला प्रश्न केले, की त्यानंतर जे होते, ते @AUThackeray यांचे झाले आहे.@ShivSenaUBT_@BJP4Mumbai @BJP4Maharashtra#BJP #Japan #Maharashtra #DevendraFadnavis pic.twitter.com/sU1raNyLNs
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)