Thane Shocker: ठाणे शहरातील एका लॉजमध्ये एका मित्रासह चेक इन केलेल्या 35 वर्षीय तरुणाचा दारू आणि मँगो ड्रिंक प्यायल्यानंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अरविंद सुखाई चौरसिया आणि त्याचा मित्र संजोग सुरेश टीनगोटे (वय, 29) या व्यक्तीने 24 जुलै रोजी ठाणे स्थानकावरून रेल्वेने शिर्डीला जाण्यासाठी योजना आखली होती. मात्र, त्यांची ट्रेन चुकली. त्यानंतर दोघांनी ठाणे स्थानकाबाहेरील एका लॉजमध्ये दोन खोल्या बुक केल्या. दोघेही दारू आणि मँगो ड्रिंक पिऊन आपापल्या खोलीत गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास टीनगोटे यांनी चौरसिया यांना फोन केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. लॉजच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने, त्याने त्याच्या मित्राची खोली उघडली. त्यावेळी त्याचा मित्र बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी कोपरी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
Thane: Man Enroute To Shirdi Found Dead After Consuming Alcohol With Mango Drink In Lodge #Shirdi #Thane #ThaneLodge #Alcohol #MangoDrink https://t.co/bxyDYkjNfH
— Free Press Journal (@fpjindia) July 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)