कार्तिकी एकादशी निमित्त आज विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार सोबत त्यांच्या पत्नी सायली पुलकुंडवार देखील होत्या. दरम्यान यावेळी मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आलेल्या उदगीर (जि.लातूर) तालुक्यातील बाबुराव बागसरी सगर व सौ.सागरबाई बाबुराव सगर या दाम्पत्याला मान मिळाला आहे. त्यांना राज्य परिवहन महामंडळाचा वर्षभर मोफत एसटी पास देण्यात आला आहे.
कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा
#कार्तिकीएकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार व सौ. सायली पुलकुंडवार तसेच मानाचे वारकरी यांच्या हस्ते करण्यात आली. राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेने सुख, समृद्धी, लाभो असे साकडे त्यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. pic.twitter.com/hNzBZpItSr
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)