Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशात न्यू आग्रा येथे वकील कॉलनीत एका तरुणाने आपल्या आईची आणि १२ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यानंतर तरुणाने स्वत:ला गळफास लावून आत्महत्या केली आहे. एकाच घरात तीन मृतदेह आढळून आल्याने या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. व्हिडिओ लॅपटॉपमध्ये सापडला, ज्यात त्याने कबुली दिली आहे की तो आर्थिक परिस्थितीशी सामना करू शकत नव्हता. त्यामुळे दोघांचा जीव घेऊन आत्महत्या करत आहे.  ही घटना शनिवारी रात्री घडली. तरुण प्रताप सिंग असं आत्महत्या करण्याऱ्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान त्याची पत्नी ही राजस्थानला नातेवाईकांकडे गेली होती. या घटनेअंतर्गत पोलिस चौकशी करत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)