Pune Suicide Cases: पुण्यात गेल्या 4 वर्षांत 4,000 हून अधिक आत्महत्यांची नोंद; पहा आकडेवारी
पुण्यात 2021 ते 2024 दरम्यान एकूण 4,022 आत्महत्यांची नोंद झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यापैकी 2,849 पुरुष आणि 1,173 महिला होत्या.
पुण्यात 2021 ते 2024 दरम्यान एकूण 4,022 आत्महत्यांची नोंद झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यापैकी 2,849 पुरुष आणि 1,173 महिला होत्या. फ्री प्रेस जर्नलने याबाबत वृत्त दिले आहे. वर्षनिहाय आकडेवारीवरून चिंताजनक परंतु किंचित घटणारा कल दिसून येतो: 2021 मध्ये 1,080 आत्महत्या झाल्या, त्यानंतर 2022 मध्ये 1,056, 2023 मध्ये 1,023 आणि 2024 मध्ये 862 आत्महत्या झाल्या. अलिकडच्याच एका घटनेत, एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्या प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने तिच्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही घटना 23 मार्च रोजी घडली. मात्र, मंगळवारी फुरसुंगी पोलिस ठाण्यात 17 वर्षीय आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (हेही वाचा: Haryana Shocker: हरियाणाच्या पंचकुला येथे कुटुंबातील सात जणांची आत्महत्या; कारमध्ये सापडले मृतदेह, सुसाईड नोटमध्ये समोर आले धक्कादायक कारण)
Pune Suicide Cases:
Shocking! Pune Records Over 4,000 Suicide Cases In 4 Years, Data Shows#Pune #PuneNews https://t.co/to7TdwcUtE
— Free Press Journal (@fpjindia) May 28, 2025
(Suicide Prevention and Mental Health Helpline Numbers:
Tele Manas (Ministry of Health)- 14416 or 1800 891 4416, NIMHANS- + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400, Peak Mind- 080-456 87786, Vandrevala Foundation- 9999 666 555, Arpita Suicide Prevention Helpline- 080-23655557, iCALL- 022-25521111 and 9152987821, COOJ Mental Health Foundation (COOJ)- 0832-2252525.)
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 29, 2025 11:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

