Kupwara Encounter: कुपवाड्यातील जुमागंद भागात सुरक्षा दलांनी पाच विदेशी दहशतवाद्यांना ठार केले असून शोध मोहीम सुरू आहे. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, कुपवाडा स्थित पोलिसांच्या विशेष तपास युनिट (SIU) पथकाने महसूल विभागाच्या अधिकार्‍यांसह, आतरबुग लालपोरा, दिवार लोलाब येथे दहशतवादी अल्मासच्या तीन मालमत्ता जप्त केल्या. मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबवली होती आणि या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत 5 पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले आहेत. (हेही वाचा - Manipur Violence: मणिपूरच्या इंफाळमध्ये पुन्हा हिंसाचार; जमावाने केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांच्या घराला लावली आग)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)