Manipur Violence: मणिपूरच्या इंफाळमध्ये पुन्हा हिंसाचार; जमावाने केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांच्या घराला लावली आग
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी केंद्रीय मंत्री घरी नव्हते. एवढेच नाही तर न्यू चेकऑन येथील दोन घरांना हल्लेखोरांनी आग लावली. त्यानंतर सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या.
Manipur Violence: मणिपूरमधील इंफाळमध्ये गुरुवारी रात्री जमावाने केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांच्या घराला आग लावली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी केंद्रीय मंत्री घरी नव्हते. एवढेच नाही तर न्यू चेकऑन येथील दोन घरांना हल्लेखोरांनी आग लावली. त्यानंतर सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. मी सध्या केरळमध्ये अधिकृत कामासाठी आहे. सुदैवाने, काल रात्री माझ्या इंफाळच्या घरी कोणीही जखमी झाले नाही. हल्लेखोर पेट्रोल बॉम्ब घेऊन आले आणि माझ्या घराच्या तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर नुकसान केलं असल्याचं राजकुमार रंजन सिंग यांनी एएनआयला सांगितलं आहे.
याआधी 14 जून रोजी अज्ञात लोकांनी इंफाळच्या लामफेल भागात महिला मंत्री नेमचा किपजेन यांच्या अधिकृत निवासस्थानालाही आग लावली होती. मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या अचानक गोळीबारात 9 जण ठार झाले तर 10 जण जखमी झाले. यादरम्यान खमेनलोक गावातील अनेक घरांनाही उपद्रवींनी आग लावली. तामेंगलाँग जिल्ह्यातील गोबाजंग येथेही अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. (हेही वाचा - Karnataka Textbook Row: कर्नाटक सरकारने शालेय पाठ्यपुस्तकांमधून वगळला RSS संस्थापक KB Hedgewar यांचा धडा)
Manipur | A mob torched Union Minister of State for External Affairs RK Ranjan Singh's residence at Kongba in Imphal on Thursday late night: Manipur Government
— ANI (@ANI) June 16, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 16, 2023 08:23 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

