Karnataka Textbook Row: कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने RSS संस्थापक केबी हेडगेवार (RSS founder KB Hedgewar) यांच्याशी संबंधित साहित्य शालेय पाठ्यपुस्तकातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी ही माहिती दिली. सिद्धरामय्या सरकारच्या या निर्णयाला कर्नाटकचे माजी शिक्षण मंत्री बीसी नागेश यांनी कडाडून विरोध केला आहे. काँग्रेसला मुस्लिमांची मते हवी आहेत आणि सिद्धरामय्या यांचे सरकार हिंदूंच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. माजी मंत्री म्हणाले की, काँग्रेस सरकार आता हिजाब घालण्याची पुन्हा अंमलबजावणी करू शकते. त्यांना अल्पसंख्याकांची मते आकर्षित करायची आहेत आणि प्रत्येक गोष्टीचे राजकारण करायचे आहे. (हेही वाचा - Delhi Fire Accident: दिल्लीतील मुखर्जी नगरच्या कोचिंग सेंटरला आग; इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून दोरीच्या साहाय्याने उतरले विद्यार्थी, Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)