Delhi Fire Accident: दिल्लीतील मुखर्जी नगरच्या कोचिंग सेंटरला आग; इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून दोरीच्या साहाय्याने उतरले विद्यार्थी, Watch Video

आग लागल्यानंतर कोचिंग सेंटरमध्ये उपस्थित विद्यार्थी बाहेर लटकलेल्या दोरीच्या साहाय्याने खाली आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एकापाठोपाठ एक विद्यार्थी दोरीवरून खाली उतरताना दिसत आहेत.

Delhi Fire Accident: दिल्लीतील मुखर्जी नगरच्या कोचिंग सेंटरला आग; इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून दोरीच्या साहाय्याने उतरले विद्यार्थी, Watch Video
Delhi Coaching center fire (PC - Twitter)

Delhi Fire Accident: दिल्लीतील मुखर्जी नगर (Mukherjee Nagar) भागातील कोचिंग सेंटरला आग (Coaching Center Fire) लागली. या घटनेची माहिती मिळताचं घटनास्थळी 11 वाहने दाखल झाली. कोचिंग सेंटरच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आग लागल्यानंतर कोचिंग सेंटरमध्ये उपस्थित विद्यार्थी दोरीच्या साहाय्याने खाली उतरून जीव वाचवताना दिसले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विद्यार्थी एकामागून एक दोरीच्या साह्याने खाली येताना दिसत आहेत. कोचिंग सेंटरमधील चार विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आग लागल्यानंतर कोचिंग सेंटरमध्ये उपस्थित विद्यार्थी बाहेर लटकलेल्या दोरीच्या साहाय्याने खाली आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एकापाठोपाठ एक विद्यार्थी दोरीवरून खाली उतरताना दिसत आहेत. (हेही वाचा - Biparjoy Cyclone Video: बिपरजॉय वादळ अवकाशातून कसं दिसतं? पहा व्हिडिओ)

मुखर्जी नगरमध्ये बत्रा सिनेमाजवळ गयाना भवन आहे, जिथे ही आग लागली. अग्निशमन दलाच्या एकूण 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मदत बचाव कार्य सुरू आहे. कोचिंग सेंटरमध्ये धुराचे लोट पसरल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 15, 2023 04:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).