Biparjoy Cyclone Video: बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या कच्छ किनारपट्टीवर धडकणार आहे. त्याचा परिणाम आता दिसू लागला असून समुद्रात वादळी लाटा उसळू लागल्या आहेत. दरम्यान, अवकाशातून बिपरजॉयची भयानक छायाचित्रे समोर आली आहेत. यूएईचे अंतराळवीर सुलतान अल नेयादी यांनी चक्रीवादळाचा व्हिडिओ इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वरून जारी केला आहे. सुलतान अल नेयादीने टिपलेल्या या दृश्यांमध्ये अरबी समुद्रावर चक्रीवादळ दिसत आहे. जे अतिशय भीषण रूप धारण करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये उंच लाटा उसळताना दिसत आहेत. याआधीही नेयादीने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ ट्विट केला होता. हा व्हिडिओही त्याने आयएसएसवरून शूट केला आहे. त्यांनी या व्हिडिओमधून वादळाचे दृश्य दाखवले आणि सर्व लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा - Cyclone Biparjoy Update: 'बिपरजॉय' चक्रीवादळ आज गुजरातला धडकणार; तिन्ही सेना दल पूर्णपणे सज्ज, 76 गाड्या रद्द)
Watch as a tropical cyclone forms over the Arabian Sea from these views I captured.
The ISS provides a unique perspective on several natural phenomena, which can assist experts on Earth in weather monitoring.🌩️🌀
Stay safe, everyone! pic.twitter.com/dgr3SnAG0F
— Sultan AlNeyadi (@Astro_Alneyadi) June 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)