जम्मू-काश्मीर च्या कुपवाडा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं CM Eknath Shinde यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. यासाठी आज मुख्यमंत्री जम्मू कश्मीर मध्ये दाखल आहेत. त्यांच्यासोबत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित होते. भारत-पाक सीमेवर उभा राहिलेला हा छत्रपती शिवरायांचा पहिलाच अश्वारूढ पुतळा आहे. "आम्ही पुणेकर" या सामाजिक संस्था आणि राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने हा पुतळा स्थापित झाला आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वाच्या लढाया आणि प्रसंग.
पहा पुतळ्याच्या अनावरणाचा क्षण
०७-११-२०२३ 📍कुपवाडा, जम्मू-काश्मीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)