Women Reach Congress Office To Get 1 Lakh: लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. त्यानंतर नवे सरकार स्थापनेचे प्रयत्न अधिक तीव्र झाले आहेत. अशा स्थितीत उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील काँग्रेस कार्यालयात नवे दृश्य पाहायला मिळाले. बुधवारी सकाळी मोठ्या संख्येने मुस्लिम महिला ‘गॅरंटी कार्ड’ घेऊन काँग्रेस मुख्यालयात पोहोचल्या. याठिकाणी उपस्थित अनेक महिलांनी आपले नाव, पत्ता व फोन क्रमांक भरून काँग्रेस ‘गॅरंटी कार्ड’ पक्ष कार्यालयात जमा केले. गॅरंटी कार्ड भरून सादर केल्यानंतर त्यांना काँग्रेस कार्यालयातून स्लिपही मिळाल्याचा दावा काही महिलांनी केला आहे. महिलांनी हे काँग्रेस हमीपत्र दाखवून एक लाख रुपयांची मागणी केली आहे. काँग्रेस जिंकल्यास महिलांना एक लाख रुपये देण्याचे आश्वासन पक्षाने दिल्याचे महिलांचे म्हणणे आहे. काँग्रेसने निवडणूक प्रचारादरम्यान पैसे देण्याचे आश्वासन दिले होते, आता इंडिया आघाडीने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आम्ही हमीपत्र सादर करण्यासाठी आलो असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. अनेक महिला हमीपत्र घेण्यासाठीदेखील आल्या होत्या. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांचा 'गॅरंटी कार्ड'मध्ये उल्लेख केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 3 एप्रिल रोजी नवी दिल्लीत पक्षाच्या या मोहिमेची सुरुवात केली होती. यामध्ये महिलांना 1 लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. (हेही वाचा: Indian Stock Market Rebounds: मोठ्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजार सावरला; लोकसभा निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी सेन्सेक्स, निफ्टीचे दमदार पुनरागमन)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)