Jemimah Rodrigues Scores Second ODI Century: कोलंबो येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) महिला तिरंगी मालिका 2025 चा पाचवा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. ज्यात जेमिमा रॉड्रिग्जने (Jemimah Rodrigues) चांगली कामगिरी करत तिचे दुसरे एकदिवसीय शतक झळकावले. गेल्या काही काळापासून भारत महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाचा अविभाज्य भाग असलेल्या दोन महत्त्वाच्या भागीदारी (स्मृती मानधनासह 88 आणि दीप्ती शर्मासह 122) केल्या ज्यामुळे महिला संघाने 50/3 धावा वरून 337/9 अशी मोठी धावसंख्या गाठली. जेमिमा रॉड्रिग्जची ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती. जेमिमा रॉड्रिग्जने 101 चेंडूत 123 धावा केल्या. ज्यात 15 चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे. यापूर्वी 2025 मध्ये तिने आयर्लंडविरुद्ध तिचे पहिले एकदिवसीय शतक झळकावले होते.
𝙃𝙐𝙉𝘿𝙍𝙀𝘿! 💯
Jemimah Rodrigues notches her Second ODI Century! 🙌
A sublime knock this from the #TeamIndia batter 👏👏
Updates ▶️ https://t.co/V5htnun1j2#WomensTriNationSeries2025 | #INDvSA | @JemiRodrigues pic.twitter.com/qhZhGTMuib
— BCCI Women (@BCCIWomen) May 7, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)