UP Hit and Run: लखनौमध्ये ट्रॅफिक कॉन्स्टेबलला अवध चौकात ड्युटीवर असताना कारने चिरडल्याची घटना समोर आली आहे. अमित कुमार असे या कॉन्स्टेबलचे नाव आहे. चुकीच्या बाजूने येणाऱ्या कारने कॉन्स्टेबलला धडक दिली आणि धडक दिल्यानंतर ते वाहन घटनास्थळावरून निघून गेले. यामध्ये अमितचा खांदा फ्रॅक्चर झाला असून, अंगावर अनेक जखमा झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर लोकबंधू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असून, पोलिसांनी तात्काळ कार चालकाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री 12.20 च्या सुमारास घडली. (हेही वाचा: Policeman Eating On Bike Video: नाशिकमध्ये कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्याने मोटरसायकलवर डब्बा ठेऊन केलं जेवण, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी करताय अधिकाऱ्याला सलाम)

 ट्रॅफिक कॉन्स्टेबलला दिली धडक व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)