Policeman Eating On Bike Video: नाशिक (Nashik)मधील एका पोलिस कर्मचाऱ्याचा (Policeman) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल (Viral Video) होत आहे. यात पोलिस कर्मचारी आपलं कर्तव्य किती चोखपणे बजावत आहे, ते दिसत आहे. व्हिडिओमध्ये पोलिस कर्मचारी मोटरसायकलवर डब्बा ठेऊन उभ्याने जेवण करताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकरी प्रतिक्रिया देत असून पोलिस कर्मचाऱ्याला सलाम करत आहेत. नाशिक शहर पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत आपली शहरे सुरक्षित ठेवण्यासाठी पडद्यामागे शांतपणे काम करणाऱ्या अशा सर्व नायक-नायिकांना सलाम केला आहे. (हेही वाचा - Viral Video: दुचाकीवर स्टंट करताना तरुणाचा अपघात, पाहा व्हिडिओ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)