दुचाकीवर स्टंट करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. रहदारीच्या रस्त्यावरुन जात असताना हा तरुण स्टंट करत होता. दरम्यान, त्याला दुचाकीवर नियंत्रण ठेवता न आल्याने त्याचा अपघात झाला. तो रस्त्यावर पडला. योगायोग असा की, रस्त्यावर रहदारी असली तरी, तो पडला तेव्हा रस्त्यावर वाहने फारशी वेगात नव्हती. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. असे वाटते आहे की, त्याच्या पाठिमागून एणाऱ्या वाहनातील कोणा एखाद्या व्यक्तीने त्याचा हा स्टंट कॅमेऱ्याने चित्रीत केला असावा. आपणही हा व्हिडिओ पाहू शकता. दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे ते समजू शकले नाही.
वाहूतक पोलीस आणि सजग नागरिकही अनेकदा अवाहन करतात की, रस्त्यावरुन वाहन हकताना उगाच थराराच्या पाठी धावू नका. ते तुमच्या जीवावर बेतू शकते. अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मात्र असे असले तरीही लोक स्टंट करण्याच्या नादात आपला जीव धोक्यात घालताना दिसतात. या व्हिडिओतही असेच काहीसे पाहायला मिळत आहे. (हेही वाचा, Viral Video: मुरादाबादमध्ये एकाच स्कूटरवरून 6 तरुणांचा जीवघेणा स्टंट, पहा व्हायरल व्हिडिओ)
व्हिडिओ
A biker falls off his bike attempting to perform a dangerous stunt on the road.#RoadSafety#SafeDriving#RecklessDriving#ActResponsibly pic.twitter.com/3h2P4uJdwZ
— Deccan Chronicle (@DeccanChronicle) December 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)