Odisha Accident: छत्तीसगड-ओडीसा सीमेवर आज एक भीषण रस्ता अपघात झाला, ज्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून, 8 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी ओव्हरटेक करताना एका वेगवान स्कॉर्पिओने रिक्षा आणि दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोमध्ये एकूण 15 जण होते, त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचाही मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, जगदलपूर शहराला लागून असलेल्या ओडिशाच्या बोरिगुमामध्ये हा अपघात झाला. या घटनेत स्कॉर्पिओमधील सर्वजण सुरक्षित आहेत. यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर, रुग्णालयात चार जणांचा मृत्यू झाला. घटनेनंतर स्कॉर्पिओ चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व लोक ओडिशातील विविध ठिकाणचे रहिवासी आहेत.

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)