रतन टाटा यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी वरळी च्या जिजामाता नगर परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. शासकीय इतमामात हे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यामुळे वरळी मध्ये वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. डॉ. अ‍ॅनी बेझंट मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. अशात आज दुपारी 1 वाजल्यापासून काही मार्ग बंद तर काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आल्याचं जाहीर केले  आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळी नाका ते रखांगी जंक्शन हा ई मोझेस मार्ग अंत्यसंस्काराच्या वाहनांशिवाय इतर सर्वांसाठी बंद असेल.

पहा आज मुंबई मधील वाहतूकीतील  बदल

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)