दोन आठवड्यांपूर्वी यूकेने भारतीय 'कोव्हिशील्ड' लसीला मान्यता दिली. परंतु यामध्ये लसीचे दोन्ही दोन घेतलेल्या भारतीयांना ब्रिटनमध्ये विलगीकरणामध्ये राहणे गरजेचे होते. भारतातील लसी प्रमाणपत्राबद्दल ब्रिटनला शंका होती. यूके सरकारने हे स्पष्ट केले होते की, त्यांना कोव्हिशील्ड' लसीबाबत कोणतीही समस्या नाही. आता बातमी समोर येत आहे की, युकेने विलगीकरणाचा हा नियम हटवला आहे. कोव्हिशील्ड किंवा यूकेने मंजूर केलेल्या दुसऱ्या कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीय प्रवाशांना 11 ऑक्टोबरपासून वेगळे राहण्याची गरज नाही. अॅलेक्स एलिस, ब्रिटिश उच्चायुक्त यांनी ही माहिती दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)