उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘पाकिस्तानी ग्रूमिंग गँग’बाबत पोस्ट केली आहे. ज्यावर आता अब्जाधीश एलोन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मस्क यांनी प्रियांका चतुर्वेदी यांचे समर्थन केले आहे. अलीकडेच ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी बाल लैंगिक शोषण प्रकरणावर भाष्य करताना ‘एशियन’ हा शब्द वापरला होता. याच शब्दावर चतुर्वेदी यांनी आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानी वंशाच्या पुरुषांचा समावेश असलेल्या टोळ्यांच्या बाल लैंगिक शोषण प्रकरणाच्या संदर्भात इंग्लंडच्या विविध भागात ‘आशियाई’ या शब्दाच्या वापरावर आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे ‘आशियाई’ नसून ‘पाकिस्तानी ग्रूमिंग गँग’ आहे.
प्रियांका चतुर्वेदी यांनी आपल्या पोस्टमध्ये, ‘एका देशाच्या चुकांसाठी संपूर्ण आशियाई समुदायाला का दोषी ठरवावे?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या या पोस्टवर एलोन मस्क यांनी हे अगदी बरोबर असल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा: Sam Altman Sex Abuse Allegation: ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमनवर बहिण Annie Altman ने केले लैंगिक शोषणाचे आरोप; खटला दाखल)
Elon Musk Supports Priyanka Chaturvedi:
True
— Elon Musk (@elonmusk) January 8, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)