कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकताच भरणपोषण आणि नुकसानभरपाईच्या रकमेबाबत एका प्रकरणावर सुनावणी करताना एक मोठा निकाल दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, पूर्वी नोकरी करणारी पत्नी निष्क्रिय बसून तिच्या विभक्त पतीकडून पूर्ण भरणपोषण घेऊ शकत नाही. तिने देखील तिच्या उदरनिर्वाहासाठी काही प्रयत्न करावेत. सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणार्‍या एका महिलेने आणि तिच्या मुलाने दाखल केलेल्या अपीलावर न्यायालयात सुनावणी सुरू होती, ज्यात महिलेला देण्यात येणारी पोटगी 10,000 रुपयांवरून 5,000 रुपये आणि नुकसानभरपाई 3,00,000 वरून कमी करून 2,00,000 करण्यात आली होती. कर्नाटक उच्च न्यायालयाने महिलेने भरपाईच्या रकमेतील कपातीला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे. ही महिला तिच्या लग्नापूर्वी काम करत होती आणि सध्या ती का काम करू शकत नाही याबद्दल तिच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण दिले गेले नाही. (हेही वाचा: National Commission for Men: राष्ट्रीय पुरुष आयोगाच्या स्थापनेच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)