HC On Removal Of Uterus and Divorce Plea: मद्रास हायकोर्टाने अलीकडेच घटस्फोटाच्या प्रकरणात एक महत्वाचे निरीक्षण नोंदवले. उच्च न्यायालयाने म्हटले की, विवाहादरम्यान अंडाशयाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर पत्नीचे गर्भाशय काढून टाकणे आणि त्यानंतर गर्भधारणा होऊ न शकणे ही बाब घटस्फोटासाठी पतीवरील मानसिक क्रूरता ठरू शकत नाही. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठात न्यायमूर्ती आरएमटी टीका रमन आणि न्यायमूर्ती पी.बी. बालाजी यांनी दिवाणी विविध अपील 2021 मध्ये हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
या प्रकरणात पत्नीला अंडाशयाचा कर्करोग झाल्याने पतीने घटस्फोटाची मागणी केली होती. पतीने 19 फेब्रुवारी 2021 रोजी कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते, ज्याने क्रूरता, त्याग आणि पत्नीची मुले जन्माला घालण्याबाबतची असमर्थता या कारणास्तव पतीने दाखल केलेली घटस्फोट याचिका फेटाळली होती. पतीने आरोप केला होता की, पत्नीला लग्नाआधीच कॅन्सर झाला होता आणि तिच्या मुलाला जन्म देण्याच्या क्षमतेबाबतची वस्तुस्थिती लपवण्यात आली होती. मात्र तपासामध्ये कर्करोग लग्नानंतर उद्भवल्याचे समोर आले. त्यामुळे जीवघेण्या परिस्थितीमुळे महिलेचे गर्भाशय काढून टाकणे हे घटस्फोटासाठी मानसिक क्रूरतेचे कारण म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. खटल्यातील विशेष परिस्थिती लक्षात घेऊन, कोर्टाने शक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या व्यवस्थापकीय संचालकांना दोन्ही पक्षांना त्यांच्या सरोगसी/मुल दत्तक घेण्यास समर्थन देण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी शिफारस केली. (हेही वाचा: Agra Shocker: सहा वर्षाच्या मुलीची बलात्कारानंतर निर्घृण हत्या, आरोपीला अटक, आग्रा येथील धक्कादायक घटना)
The Madras HC observed that if a woman who is diagnosed with ‘ovarian cancer’ gets her uterus removed, the same cannot be treated as cruelty to the husband
Full story: https://t.co/l1VtXNzVzO#madrashc #marriage #cancer #judiciary #news #law #india #health pic.twitter.com/4Ef2ITqbBk
— News18.com (@news18dotcom) January 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)