देशाच्या आर्थिक विकासाबाबत मोठी बातमी आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 4.1 टक्के होता. मंगळवारी जाहीर झालेल्या आकडेवारीत सरकारने आपल्या सकल देशांतर्गत उत्पादनाबाबत (GDP) महत्त्वाची माहिती दिली. गेल्या वर्षी याच तिमाहीत (Q4 2020-21) देशाचा GDP 39.18 लाख कोटी रुपये होता, जो या वर्षी वाढून 40.78 लाख कोटी रुपये झाला आहे. सरकारने म्हटले आहे की 2021-22 या आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 8.7 टक्के झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात तो 6.6 टक्के होता.
GDP grew 8.7% in FY 2021-22, Quarter 4 GDP at 4%: Govt of India pic.twitter.com/qvcYwKqfzz
— ANI (@ANI) May 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)