IMF India's GDP Growth Forecast: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने या आर्थिक वर्षासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज वाढवला आहे. आयएमएफच्या अंदाजानुसार भारताची अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 7 टक्के वेगाने वाढू शकते. यापूर्वी 6.8 टक्के वाढीचा अंदाज देण्यात आला होता. फंडाने मंगळवारीच वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक सादर केला आहे. आयएमएफने आर्थिक वर्ष 2026 साठी अर्थव्यवस्थेतील 6.5 टक्के वाढीच्या अंदाजात कोणताही बदल केलेला नाही. याआधी जूनमध्ये रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षाचा विकासदर 7 टक्क्यांवरून 7.2 टक्के केला होता. गेल्या 3 आर्थिक वर्षांपासून देशाने 7 टक्क्यांहून अधिक वाढ राखली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 8.2 टक्के दराने वाढली होती. गेल्या आर्थिक वर्षात गुंतवणुकीत वाढ आणि चांगले उत्पादन क्षेत्र यामुळे अर्थव्यवस्थेला मदत झाली. फंडाने जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आपला अंदाज स्थिर ठेवला आहे. आयएमएफच्या मते, 2024 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था 3.2 टक्के वेगाने वाढू शकते. 2025 मध्ये त्यात 3.3 टक्के वाढ होऊ शकते. (हेही वाचा: 7th Pay Commission: कर्नाटक सरकारचा 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय, एकूण वेतन 27% पेक्षा अधिक होणार)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)