India's GDP Growth: वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनातली (GDP) मजबूत 8.4% वाढ झाली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, हा वेग विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. मागील तिमाहीतील 8.1 टक्के वाढीपेक्षा हे प्रमाण खूप जास्त आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने याच कालावधीसाठी 6.5 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. जीडीपीमध्ये मजबूत वाढ हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक लक्षण आहे. अर्थव्यवस्थेच्या या वेगानंतर 2023-24 या आर्थिक वर्षातील वाढीचा अंदाजही बदलण्यात आला आहे. पूर्वीच्या 7 टक्क्यांच्या तुलनेत तो 7.6 टक्के करण्यात आला आहे. तिसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था 6.6 टक्के दराने वाढेल, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र, हे सर्व अंदाज फोल ठरले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जीडीपीच्या स्फोटक आकडेवारीवर प्रतिक्रिया दिली. 'भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद आणि क्षमता दर्शवते', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. वेगवान आर्थिक विकासासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील, ज्यामुळे 140 कोटी भारतीयांचे  जीवनमान उंचावण्यासाठी आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी मदत होईल, याचा पुनरुच्चारही पंतप्रधानांनी केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)