Devotees Drink AC Water As ‘Charanamrit': मथुरा-वृंदावनच्या प्रसिद्ध बांके बिहारी मंदिराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही भाविक हत्तीसारख्या आकृतीतून टपकणारे पाणी पिताना दिसत आहेत. हे पाणी मंदिरातील चरणामृत असल्याचे समजून भाविक ते प्राशन करत आहे. मात्र हे पाणी एसीमधून सोडण्यात आलेले पाणी आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण लोकांना हे चरणामृत नसून ते एसी पाणी असल्याचे सांगत असल्याचेही ऐकू येत आहे, परंतु त्याचे कोणीही ऐकत नाही. मंदिराच्या भिंतीमागील एका जागेतून बाहेर पडणारे पाणी लोक चरणामृत समजून पीत आहेत, तर काही लोक हे पाणी डोक्याला लावत आहेत, अनेकजण ते भांड्यात भरून घेऊन जात आहेत. हा व्हिडिओ बनवणारा तरुण या लोकांना समजावून सांगत आहे की, हे ठाकुरजींचे चरणामृत नसून एसीतील खराब पाणी आहे. ते प्यायल्यानंतर लोक आजारी देखील होऊ शकतात.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, डॉ. ॲबी फिलिप्स, उर्फ 'द लिव्हर डॉक' यांनी याबाबत एक तपशीलवार पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये एसी पाणी का पिऊ नये, याबाबत माहिती देण्यात आली अआहे. त्यांनी नमूद केले की, एसी कंडेन्स्ड पाण्याच्या संपर्कात आल्याने लीजिओनेला नावाच्या जीवाणूंच्या प्रजातींद्वारे पसरणारा लीजिओनेयर्स (Legionnaires) रोग नावाचा भयानक रोग होऊ शकतो. (हेही वाचा: World's Fastest Growing Religion: भारतामध्ये 2050 पर्यंत असेल जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या; हिंदू ठरेल जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म- Pew Report)
Devotees Drink AC Water As ‘Charanamrit':
Serious education is needed 100%
People are drinking AC water, thinking it is 'Charanamrit' from the feet of God !! pic.twitter.com/bYJTwbvnNK
— ZORO (@BroominsKaBaap) November 3, 2024
PLEASE DO NOT DRINK AIR CONDITIONING WATER!
Cooling and air conditioning systems are breeding grounds for many types of infections including fungus, some really hellish.
Exposure to air conditioning condensed water can lead to a terrifying disease known as Legionnaires'… https://t.co/FhOly0P7Dj
— TheLiverDoc (@theliverdr) November 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)