भारतीय रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना व्हीलचेअरच्या सुविधेसह विविध सुविधा पुरवते. जर एखाद्या प्रवाशाला चालता येत नसेल तर अशा व्यक्तीला व्हीलचेअरची सुविधा वापरता येते. त्यासाठी प्रवाशाला शुल्क भरावे लागते. प्रत्येक स्थानकावर शुल्क यादी दिलेली आहे. आता दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवर एका परवानाधारक पोर्टरने एनआरआयकडून (परदेशी नागरिक) व्हीलचेअरसाठी तब्बल 10,000 रुपये उकळले. याबाबत तक्रार केल्यानंतर रेल्वेने कारवाई करत तीन पोर्टर्सचे परवाने रद्द केले.

हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर एका अनिवासी भारतीय प्रवाशाला व्हीलचेअरवर बसवून फलाटावर नेण्यासाठी रेल्वेच्या परवानाधारक कुलीने 10,000 रुपये घेतले. हे प्रकरण समोर आल्यानंतर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, दिल्ली विभाग यांनी तत्काळ कारवाई करून दोषी परवानाधारक कुलीचा परवाना रद्द केला व त्याचा बॅज परत घेतला. याशिवाय या प्रकरणात हस्तक्षेप करून 90 टक्के रक्कम प्रवाशाला परत करण्यात आली आहे. दिल्ली विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आणि प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास देण्यासाठी रेल्वे कटिबद्ध असल्याचे सांगितले. (हेही वाचा: Wi-Fi in Air India Flights: 1 जानेवारीपासून एअर इंडियाच्या विमानांमध्ये वाय-फायची सुविधा उपलब्ध; ठरली भारतातील पहिली एअरलाइन)

कुलीने व्हीलचेअर सेवा देण्यासाठी आकारले तब्बल 10,000 रुपये-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)