Wi-Fi in Air India Flights: एअर इंडियाने (Air India) 1 जानेवारी 2025 पासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये इन-फ्लाइट वाय-फाय इंटरनेट सेवा सुरू केली आहे. ही सुविधा Airbus A350, Boeing 787-9 आणि काही Airbus A321neo विमानांवर उपलब्ध असेल. या सेवेसह, विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना इंटरनेटशी कनेक्ट(Internet on Flights)करण्याचा पर्याय उपलब्ध करून देणारी एअर इंडिया ही भारतातील पहिली विमान कंपनी ठरली आहे.(Air India घरवापसी नंतर Ratan Tata यांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले 'Welcome Back')
एअर इंडियाचे अधिकारी राजेश डोगरा म्हणाले की, “कनेक्टिव्हिटी हा आधुनिक प्रवासाचा अविभाज्य भाग बनला आहे. मग तो सोशल मीडियावर रिअल-टाइम शेअरिंगचा आनंद असो किंवा कामाची उत्पादकता वाढवण्याचे साधन असो, सर्व प्रवासी नवीन सुविधेचा पूर्ण आनंद घेतील.” प्रवासादरम्यान, प्रवासी लॅपटॉप, टॅब्लेट आणि स्मार्टफोन यांसारख्या वाय-फाय-सक्षम उपकरणांचा वापर करून इंटरनेटचा वापर करू शकतात. ही सेवा 10,000 फूट उंचीवर उपलब्ध असेल आणि प्रवासी एकाच वेळी अनेक उपकरणे कनेक्ट करू शकतात.
सुरुवातीच्या कालावधीसाठी मोफत सेवा
सुरुवातीच्या काळात ही सेवा मोफत उपलब्ध असेल. हे नवीन वैशिष्ट्य प्रथम आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी प्रायोगिक कार्यक्रमांतर्गत लागू करण्यात आले होते. ज्यामध्ये न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस आणि सिंगापूर सारख्या गंतव्यस्थानांचा समावेश होता.
एअर इंडियाचे भविष्य
टाटा समूहाने 1932 मध्ये सुरू केलेला एअर इंडिया समूह भारतातील विमान वाहतूक क्षेत्रात एका नव्या युगाचे नेतृत्व करत आहे. सध्या, टाटा समूह 300 हून अधिक विमाने चालवतो आणि 55 देशांतर्गत आणि 48 आंतरराष्ट्रीय विमाणतळांवर सेवा देतो.