तुम्ही कधी विचार केला आहे की, कोंबडा एखाद्याचा जीव घेऊ शकतो? किंवा कोंबड्यामुळे कोणाचा मृत्यू होऊ शकतो? नाही ना? मात्र आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. एका कोंबड्यामुळे तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आसाममधील कछार जिल्ह्यातील लखीमपूर भागात ही घटना घडली आहे.

अहवालानुसार, एक कोंबडा विहिरीत पडला होता. त्याला वाचवण्यासाठी घरातील लहान मुलाने विहिरीत उडी घेतली. बराच वेळ तो बाहेर न आल्याने मोठ्या भावानेही पाण्यात उडी मारली. मात्र तोही बाहेर न आल्याचे पाहून एक स्थानिक मुलगाही विहिरीत गेला. या तिघांचाही बराच वेळ कोणताही मागमूस न लागल्याने कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलीस-प्रशासनाने एसडीआरएफला पाचारण केले. यानंतर रेस्क्यू ऑपरेशनमध्ये टीमने विहिरीतून तिघांचे मृतदेह बाहेर काढले. माहितीनुसार, विहिरीतील विषारी वायूमुळे गुदमरून तिघांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे एका कोंबड्याला वाचवण्याचा नादात तीन लोकांचा मृत्यू झाला. (हेही वाचा: Kerala Shocker: मालमत्तेच्या वादातून 71 वर्षीय व्यक्तीने केली आपल्या 64 वर्षीय पत्नीची हत्या; स्वतः पोलिसांकडे जाऊन दिली गुन्ह्याची कबुली)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)