आज 1 जुलै पासून अमरनाथ यात्रेची पहिली बॅच Ganderbal,कडून अमरनाथ गुंफेकडे रवाना झाली आहे. भाविकांमध्ये या यात्रेसाठी विशेष उत्साह आणि आकर्षण असतं. दरम्यान भोलेनाथ चा जयजयकार करत भाविकांचा प्रवास सुरू झाला आहे. 30 जूनला सुमारे 2500 भाविकांचे तात्काळ रजिस्ट्रेशन देखील करण्यात आले आहे. 62 दिवसांची ही यात्रा कश्मीर मध्ये 2 मार्गांवर सुरू झाली आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पारंपारिक 48 किमी लांबीचा नुनवान-पहलगाम रस्ता आणि गांदरबल जिल्ह्यातील 14 किमीचा बालटाल रस्ता असे दोन रस्ते आहेत.
पहा ट्वीट
#WATCH | Amarnath Yatra 2023: First batch of pilgrims begin yatra from Baltal base camp in Ganderbal, J&K to Amarnath Cave. pic.twitter.com/L4AUwjfGYU
— ANI (@ANI) July 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)