Bihar Road Accident: बिहारमधील पाटणा येथे भीषण रस्ता अपघात झाला आहे. स्कॉर्पिओ आणि ट्रकच्या धडकेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिस अधिकारी अभिषेक सिंह यांनी सांगितले की, बख्तियारपूर येथील NH-31 वर आज सकाळी झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. ५ जखमींवर उपचार सुरु आहे. मृतदेह पोस्टमार्ट करण्यासाठी पाठण्यात आले आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे. पुढील कायदेशी कारवाई करण्यात येत आहे. (हेही वाचा- Scorpio आणि XUV 700 ची समोरासमोर धडक, 3 जणांचा मृत्यू (Watch Video)
#WATCH | Bihar: Abhishek Singh, Sub-Divisional Police Officer, Barh-2 says, "Six people have died in a road accident that took place on NH-31 in Bakhtiarpur, earlier today. The injured were taken to the hospital by the police team that reached the spot. 5 injured people are… pic.twitter.com/PoLbhXXoxb
— ANI (@ANI) July 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)