केंद्र सरकारने आजपासून दशातील सुमारे 10 लाख तरुणांना रोजगार देण्यासंदर्भातील योजनेला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 75 हजार तरुणांना रोजगार देण्याचे केंद्राचे लक्ष्य आहे. त्यानुसार केंद्र सरकारने भरती काढली आहे.
भारतीय रेल्वेने केलेल्या ट्विनुसार, रेल्वे मंत्रालयात असिस्टंट लोको पायलट, टेक्निशियन, स्टेशन मास्तर,टाईम कीपर, क्लर्क, ट्रॅफीक असिस्टंट पदावर भरती होणार आहे.
गृहमंत्रालयामध्ये असिस्टंट कमिश्नर, सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल यांसारख्या पदासाठी भरती निघणार आहे.
ट्विट
#RozgarMela @DoPTGoI@PMOIndia@RailMinIndia @AshwiniVaishnaw pic.twitter.com/6eJ5fgfSES
— North Eastern Railway (@nerailwaygkp) October 22, 2022
महसूल विभागात असिस्टंट एक्जीक्यूटिव्ह इंजीनियर, सायंटीस्ट, एईई डीआरटी कॅडर, एसओ, सिव्हिलियन मोटर ट्रायव्हर आदि पदांसाठी भरती निघणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)