Stampede-Like Situation In Mumbai: सध्या अनेक कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरु आहे, नवीन नोकरभरती थांबली आहे. यामुळे बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या भरूच येथे वॉक-इन मुलाखतीवेळी तरुणांची इतकी गर्दी झाली की अक्षरशः चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली होती. आता मुंबईमध्येही अशीच परिस्थिती दिसून आली. मुंबईच्या कलिनामध्ये एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने वॉक-इन मुलाखतीची घोषणा केली होती, त्यावेळी नोकरी शोधणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. उमेदवारांच्या प्रचंड संख्येमुळे गोंधळाची आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर कंपनीने लोकांना त्यांचे सीव्ही सोडून, परिसर रिकामा करण्यास सांगितले. एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने अद्याप या घटनेबद्दल आणि भरती प्रक्रियेच्या पुढील चरणांबद्दल अधिकृत विधान जारी केलेले नाही. (हेही वाचा: IAS Puja Khedkar's Training Put On Hold: प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरवर मोठी कारवाई; प्रशिक्षणावर तात्काळ स्थगिती, मसुरी अकादमीने परत बोलावले)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)